Friday 7 October 2022

खास सेल्फी

माझ्या चौथीच्या वर्गातील विवेक याने ३० पर्यंत पाढे पाठांतर केले.त्याबद्दल त्याच्यासोबत खास सेल्फी काढली. मुलांना दिवाळीच्या सुट्टीपर्यंत ३० पर्यंत पाढे पाठांतर करण्याचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट विवेकनं पहिल्यांदा पूर्ण केलं. बरीच मुले उद्दिष्टाच्या जवळपास आली आहेत. स्वतः पाढेही तयार करतात.गणितातील सर्व क्रिया उत्तम करतात.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुलांची अध्ययन क्षती झाली होती. ती आता भरून निघत आहे. वाचन व गणितातील मुलभूत क्षमता गतीनं प्राप्त करत आहेत.

 अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांना प्रेरीत करतात.म्हणून खास सेल्फी.

No comments:

Post a Comment