Sunday 18 September 2022

ग्रंथालय समृद्धीकरण

आमच्या शाळेच्या ग्रंथालयात नवनवीन पुस्तकांची भर घालणे सुरू आहे. लोकसहभाग,शिक्षकसहभागातून काही उत्तम पुस्तकं शाळेच्या ग्रंथालयात दाखल झाली आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती) पुणे यांच्यामार्फत प्रकाशित किशोरचे १४ खंड व इतर पुस्तके ग्रंथालयात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी ही पुस्तके उपयुक्त आहेत.

या पुस्तकांच्या माध्यमातून परिपाठात प्रकटवाचन, अभिवाचन, पुस्तक परिचय लिहणे, पुस्तकावर गटचर्चा आयोजित करणे असे उपक्रम शाळेत राबविणार आहोत.

ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वांना प्रेरीत करण्यात येत आहे. वाचनचळवळ लोकचळवळ व्हावी.


No comments:

Post a Comment