Sunday 26 June 2022

सुट्टी एके सुट्टी-मंगेश पाडगावकर

सांग सांग बोलानाथ पाऊस पडेल काय? हे गाणे प्रत्येक बालकांच्या लहानपणीची समृद्ध आठवण आहे.मंगेश पाडगावकरांची अशी अनेक कविता,गीते बालमनाला मोहीनी घालतात.त्यांनी मुलांसाठी खूप लेखन केले.त्यांचे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

सुट्टी एके सुट्टी हा मंगेश पाडगावकर यांचा बालकवितासंग्रह. या बालकवितासंग्रहाच्या सुरूवातीलाच मुलांसाठीच्या कवितांबद्दलची भूमीका स्पष्ट केली आहे.या संग्रहात एकूण तेहतीस कविता आहेत.या बालकवितासंग्रहाची पहिली आवृत्ती मौज प्रकाशन,मुंबई यांनी १९९२ साली प्रकाशित केलेली असून या संग्रहाच्या आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत.या कवितासंग्रहातील मनोवेधक चित्रे पुंडलिक वझे यांनी काढलेली आहेत. 

भाजी घ्या भाजी भाजी कविता खूपच मजेदार आहे.सगळ्या भाज्यांचे गंमतीदार वर्णन या कवितेत केलेले आहे.मुलांना नादमय शब्द खूप आवडतात.अशा नादमय शब्द असणाऱ्या ढिमिकि ढिम्,अडम तडम या कविता संग्रहात आल्या आहेत. उत्तर कंसात आहे सारखी कविता मुलांची जिज्ञासावृत्ती,चिकित्सकवृत्ती वाढविणारी आहे.माकड नटलं ही छोटीशीच कविता खूप मजेदार आहे.

अट्टा बट्टा
अट्टा बट्टा
माकड करतय 
नट्टा फट्टा 

शेळीचं लगीन,पावसाचं चित्र कशासाठी पोटासाठी या कविताही मुलांना आवडणार्‍या आहेत.पालकांनी मुलांसोबत या कविता वाचायला हव्यात. मुलांना वाचण्यासाठी हा बालकवितासंग्रह उपलब्ध करून द्यायला हवा.यामुळे मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागेल,त्यांचे अनुभवविश्व समृद्ध होईल. 

बालकवितासंग्रह:सुट्टी एके सुट्टी
कवी: मंगेश पाडगावकर 
पुस्तक परिचय:समाधान शिकेतोड 
प्रकाशन:मौज प्रकाशन, मुंबई 
किंमत:- २५/- रू.
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

No comments:

Post a Comment