Thursday 2 June 2022

मोबाईलचा वापर जपून करायला हवा

आज सकाळी वर्तमानपत्रांचे वाचन करताना एक बातमी मनाला खूप वेदना देऊन गेली. अवघ्या आठ वर्षाच्या मुलांनं मोबाईलमधील हाॅर्रर गेम पाहून स्वतःचं जीवन संपवलं.

पालकांनी मुलांना मोबाईल दिल्यानंतर मुलं काय पाहतात?किती वेळ मोबाईलवर घालवतात याकडे लक्ष द्यायला हवे. मुलांना मोबाईल देऊन स्वतःचं काम करत बसण्याकडे पालकांचा कल असतो.मोबाईल दिल्यानंतर स्वतः मुलांसोबत बसणं आवश्यक आहे.कोणत्या बाबी पाहायच्या हे ठरवून घ्यायला हवं.

मुलांचा मोबाईल वापर याकडे आज गांभीर्यपूर्वक पाहण्याची गरज आहे.मोबाईलचा वापर हळूहळू कमी करायला हवा.त्यासाठी पालकांनी मुलांना भरपूर पुस्तके उपलब्ध करून द्यायला हवीत.मुलांसोबत पुस्तकाचे वाचन करायला हवे.

#चला_पुस्तके_वाचूया

No comments:

Post a Comment