Thursday 28 November 2019

आज एक पत्र मिळालं

आज उस्मानाबाद तालुक्याच्या गुणवत्ता कक्षाच्या बैठकीसाठी गेलो होतो.परत DIET मध्ये आपल्यावर एक आंतर्देशीय पत्र आल्याचं समजतं. कुतूहलाने पत्र फोडून वाचू लागलो.खुप छान पत्र मिळाल्याचा आनंद मिळाला.
नगर परिषद शाळा क्रमांक 18 या शाळेतील इयत्ता सातवीच्या सर्व मुलांना मी बालकुमार दिवाळी अंक दिले होते.या अंकात विशेष यश संपादन केलेल्या भारतातील सहा मुलांच्या यशोगाथा होत्या.
उजमा काझी या विद्यार्थींनीने बालकुमार दिवाळी अंक आवडल्याचं लिहिलं होत.एका गरीब कुटुंबातील मुलगी वयाच्या 13 व्या वर्षी B.Sc करते.हे तीला खुपच भावलं होतं.दिवाळी अंकाबद्दलचा अभिप्राय वाचून खूप छान वाटलं.


No comments:

Post a Comment