Saturday 3 September 2022

वर्गमंत्रीमंडळाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचा विकास

आज इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वर्गमंत्रीमंडळ तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची,जीवनकौशल्याची रूजवणूक व्हावी. विद्यार्थ्यांमध्ये परस्परांमध्ये आंतरक्रिया घडून यावी. वर्गातील व शाळेतील विविध उपक्रमात, प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढावा.यासाठी वर्गमंत्रीमंडळ तयार करण्यात आलेले आहे. यासाठी वर्गातील विद्यार्थीही खुपच उत्सुक होते.

आज गुप्त मतदान पद्धतीने मुख्यमंत्री व उप मुख्यंमंत्री यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मदतीने मंत्री निवडण्यात आलेले आलेले आहेत. मुलांना हा आगळावेगळा अनुभव खूपच आवडला. मंत्रीगणांना लवकरच विषयांचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रंथालय,श्रुतलेखन, पाढे पाठांतर,स्वच्छता,शिकू आनंदे कृतीपुस्तीका,वाचनकोपरा, परिपाठ,प्रकल्प,सहशालेय उपक्रम, अवांतर वाचन, स्पोकन इंग्लिश, सुंदर हस्ताक्षर, उपस्थिती, गणिती क्रिया, नकाशा वाचन व भरणे, सामान्य ज्ञान इत्यादी खाती असणार आहे. मुलांसोबत हा आजचा अनुभव मलाही समृद्ध करून गेला.

No comments:

Post a Comment