Friday 22 July 2022

सर,मी कविता लिहिते

 आज सकाळी शाळे गेल्यावर काल जिल्हा परिषदेत संपन्न झालेल्या कार्यशाळेबद्दल चर्चा करत होतो.सकाळची स्वाक्षरी हजेरीपटावर केली.तेवढ्यात एक मुलगी कार्यालयात आली.तिने स्वत:चा परिचय दिला.सर,मी M.Sc केली आहे.सध्या एमपीएससी ची तयारी करत आहे.मी काही कविता केल्या आहेत.त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत.मला खर तर खूप आनंद वाटला की या गावातील मुली उच्च शिक्षण घेत आहेत.मुलीनी शिकायला हवं.तिच्या कुटुंबाविषयी जाणून घेतल्यानंतर समजले की तिचा एक भाऊ व एक बहिणसुद्धा शिक्षण घेत आहेत.ती सध्या PSI,STI तसेच राज्यसेवा परीक्षांची तयारी करत आहे.तिच्याकडून गावातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाची माहिती घेतली.भविष्यात या सर्वांसाठी एखादी कार्यशाळा आयोजित करता येईल असेही तिला सांगितले.


तिनं कविता केल्या आहेत,म्हटल्यावर वाचून त्यावर प्रतिक्रिया देईल असे सांगितले.तिनं मुख्याध्यापकांना विचारून जुनी पाचवी ते आठवीची शालेय पुस्तके घेतली.तिनं सांगितलं की माझं लग्न आठवीतच झालं असतं पण मला शिकण्याची जिद्द होती.मी याच शाळेत शिक्षण घेतलय.मला वाचनाचा लहानपणीपासून खूप छंद होता.मी शाळेतील इतर मुलांचीही पुस्तके घेऊन वाचन करत असायचे.

ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेत आहेत.स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.याचा आनंद वाटला.या तरुणांसाठी नक्कीच मदत करण्याचा निश्चयही केला.

No comments:

Post a Comment