Sunday 13 December 2020

नवे विचार,नव्या संकल्पना

मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी नेहमी मनात नवीन नवीन विचार येत असतात.या विचारांना पकडायला पाहिजेच.नाहीतर अलगद निसटतात.हे विचार मनांत पिंगा घालतात,घोळत असतात.त्यातून नाविन्यपूर्ण संकल्पना जन्म घेतात.पण त्या कागदावर नाही टिपल्या तर विरून जातात.म्हणून रात्री झोपताना मी कागद-पेन घेऊन झोपत असतो.


परवा रात्री झोपताना अशी एक संकल्पना माझ्या मनात आली. मुलांच्या भाषिक विकासासाठी प्रत्येक मुलाला "किशोर" मासिक वाचायला मिळाले पाहिजे. किशोर हे मासिक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणे (बालभारती) यांच्या मार्फत दर महिन्याला प्रकाशित केले जाते. मुले याची आतुरतेने वाट पाहत असतात. या मासिकांमध्ये मुलांसाठी कविता, कथा, विनोद, कोडी,चित्रे, सामान्य ज्ञान, चित्रकला असा भरगच्च खजिना असतो. मुलांच्या पसंतीला हे मासिक उतरलेले आहे. मुलांच्या भाषिक विकासासाठी,व्यक्तिमत्त्व विकासासाठी किशोर मासिक खूपच उपयुक्त आहे.


मुलांनी लिहिलेल्या कविता,गोष्टी या मासिकांमध्ये येत असतात. त्यामुळे मुलांच्या अभिव्यक्ती विकसनासाठी या मासिकाची खूप मदत होते. त्यासाठी प्रत्येक महिन्याचे मासिक मुलाच्या घरच्या पत्त्यावर यायला हवे असा विचार माझ्या मनात आला.मी शाळा सिद्धी मूल्यांकनासाठी अकोला जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती.शाळेत मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळत होते.मुले बोलकी होती.शाळेत पूरक वाचनासाठी भरपूर पुस्तके होती.सर्व मुलांच्या घरच्या पत्त्यावर किशोर मासिक येत होते.ही संकल्पना भन्नाट होती.

 

माझ्याही जिल्ह्यात हा प्रयोग राबवावा असे मला वाटते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनापुढे ही संकल्पना मांडणार आहे. लोकसहभाग किंवा कोणत्या योजनेमधून ही संकल्पना सिद्धीस जातेय.याची मला उत्सुकता असणार आहे.







No comments:

Post a Comment