Monday 23 December 2019

उपक्रमशील शिक्षक सोमनाथ वाळके व विक्रम अडसुळ यांना राष्ट्रीय आय.सी.टी.पुरस्कार प्रदान

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथील उपक्रमशील शिक्षक सोमनाथ वाळके व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगर वस्ती जिल्हा अहमदनगर येथील उपक्रमशील शिक्षक विक्रम अडसूळ यांना यंदाचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार मानव विकास संसाधन मंत्रालयातर्फे आज मानव संसाधन विकास राज्यमंत्री मा.संजय धोत्रे यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे  सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

सोमनाथ वाळके यांनी आपली शाळा लाखो रुपयाचा लोकसहभाग मिळवून समृद्ध केलेली आहे.प्रत्येक मुल समजून घेऊन शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या आहेत.त्यांनी मुलांची आवड लक्षात घेऊन आपल्या शाळेत राज्यातील पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओ उभा केला.या रेकॉर्डिंग स्टुडिओ च्या माध्यमातून मुलांना अध्ययन अनुभव दिले.रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये विद्यार्थी छान गीते गातात,भाषण करतात.मुलांच्या भाषा विकासासाठी या स्टुडिओचा खूप चांगला उपयोग होत आहे.विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देताना त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन अनुभव दिल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिकणं सोपं झालं.तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यासाठी त्यांनी कम्प्युटर, प्रोजेक्टर, टॅबलेट, अँड्रॉइड मोबाईल,टीव्ही, 3d क्लास रूम इत्यादी बाबींचा वापर केला. स्वतःचं यूट्यूब चॅनल असून अनेक उपक्रमशील शिक्षकांना ते मार्गदर्शन करत असतात.सोमनाथ वाळके स्वतः उत्कृष्ट ब्लॉगर आहेत.शासनाच्या 'दीक्षा'ॲपसाठी त्यांनी डिजिटल शैक्षणिक साहित्य तयार केले असून,ते राज्यभरातील शिक्षक,विद्यार्थी व पालकांकडून वापरले जात आहे. सोमनाथ वाळके यांना यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार व 'मायक्रोसॉफ्ट'चा इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट हा पुरस्कारही मिळाला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगर वस्ती येथील तंत्रस्नेही शिक्षक विक्रम अडसूळ यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे धडे दिले. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेत राबविल्या आहेत.त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची होणारी गळती थांबविली.यासाठी त्यांनी मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध कल्पना लढविल्या.मुलांना लॅपटॉप व कम्प्युटरही च्या मदतीने अध्ययन अनुभव देऊन विविध संकल्पना स्पष्ट केल्या.त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेत राबविले.त्यांचे स्वतःचे युट्युब चॅनेल असून ते नियमितपणे ब्लॉगवर लेखन करतात.केंद्र शासनाचा यापूर्वीचा त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.त्यांनी इतिहास विषयासाठी राज्य अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून काम केलेले आहे. 

 सोमनाथ वाळके व विक्रम अडसुळ या दोन्ही मित्रांचा खुप खुप अभिमान वाटतो.हे दोघेही माझे जीवलग मित्र आहेत. या दोघांसोबत अनेकदा काम करण्याची संधी मिळाली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे झटणा-या या प्रयोगशील शिक्षकांना सलाम....



No comments:

Post a Comment