Friday 3 January 2020

समाधान शिकेतोड यांच्या "पोपटाची पार्टी" या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

समाधान शिकेतोड यांच्या "पोपटाची  पार्टी" या बालकवितासंग्रहाचे  प्रकाशन  मा.डॉ.संजय कोलते,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.विवेक जॉन्सन,परिविक्षाधीन जिल्हाधिकारी,मा.अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.डाॅ.संजय तुबाकले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी,मा.अजिंक्य पवार,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, मा.डाॅ.इब्राहिम नदाफ,प्राचार्य,डायट मा.रोहीणी कुंभार,उपशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे खातेप्रमुख,शिक्षण विभाग व डायटमधील अधिकारी व विषय सहायक उपस्थित होते.

याप्रसंगी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या व कवीचे अभिनंदन केले.कवितासंग्रहाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की यातील कविता मुलांच्या भावविश्वाला साद घालणा-या आहेत.प्राण्यांच्या गंमती जंमती,स्वच्छतेचा संदेश देणा-या,ग्रामीण जीवनाची अनुभूती देणा-या या कवितांमधुन मुलांना आनंद मिळेल.

समाधान शिकेतोड यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला असुन मुलांसाठी ते  सातत्याने लेखन करत असतात.यापुर्वी त्यांचे "माझा विद्यार्थी"हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती) येथे मराठी अभ्याससगट सदस्य म्हणून काम करत आहेत.मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी,भाषा समृद्धीसाठी  सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात.मराठी विषय सहायक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे काम करत आहेत. 

या कवितासंग्रहाला बालभारतीच्या "किशोर" मासिकाचे संपादक मा.किरण केंद्रे यांचा अभिप्राय लाभलेला आहे.इसाप प्रकाशन, नांदेड  हे या पुस्तकाचे प्रकाशक  आहेत.कवितासंग्राहात मुलांना भावतील अशी सुंदर सुंदर चित्रे काढलेली आहेत.

No comments:

Post a Comment