Thursday 9 March 2023

विमानवारी

जि.प.उस्मानाबाद (धाराशिव) मार्फत श्रीहरीकोट्टा,आंध्रप्रदेश येथे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची विमानाने विज्ञान सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय परीक्षा आयोजित केलेली आहे.

पहिला केंद्रस्तरीय परीक्षेचा टप्पा पूर्ण झाला असून या परीक्षेत चिलवडी केंद्रातून जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी शाळेतील सात विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रात सर्वात जास्त विद्यार्थी राघुचीवाडी शाळेतील विद्यार्थी पात्र झालेले आहेत. 

या पहिल्या टप्प्यावर यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे  अभिनंदन.

No comments:

Post a Comment