Sunday 12 March 2023

राघुचीवाडी येथे शहीद जवान आनंद गेजगे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व स्मारकाचे अनावरण सोहळा संपन्न

शहीद जवान आनंद गेजगे गडचिरोली (अहेरी) या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कार्यरत असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरूंग स्फोटात त्यांना विरमरण आले होते. त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व स्मारकाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.आमदार कैलास पाटील, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडन्ट मा.विशाल कोरे, माजी नगरसेवक मा.सिद्धार्थ बनसोडे, भाजपा युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष मा.राजसिंहराजे निंबाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी मा. दत्तप्रसाद जंगम, मा. भारत देवगुडे,मुख्याध्यापक मा.महादेव थोरात उपस्थित होते.

याप्रसंगी उस्मानाबाद पोलीस दलामार्फत शहीद जवान आनंद गेजगे यांना मानवंदना देण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडन्ट मा.विशाल कोरे,मा.आमदार कैलास पाटील यांनी यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी शहीद जवान आनंद गेजगे यांच्या मातोश्री कमलबाई गेजगे व त्यांचे बंधु चेन्नई येथे कार्यरत असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान श्री.श्याम गेजगे यांचाही सत्कार करण्यात आला. राघुचीवाडी गावातील माजी सैनिकांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला गावातील सर्व ग्रामस्थ, माजी सैनिक, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री.प्रेमनाथ जाधव व आभार प्रदर्शन श्री.समाधान शिकेतोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील श्री.शंकर मोरे,श्री.दर्लिंग बेलदार, श्री. दत्ता गोरवे,श्री.ॠषी यमगर, श्री.तानाजी करवर, श्री.गौतम गेजगे, श्री.अजिनाथ गोरवे, श्री. अंजू नामदास, श्री.महेश खंदारे व शहीद जवान आनंद गेजगे मित्रपरिवारातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment