Friday 28 February 2020

राष्ट्रीय विज्ञान दिन

                    राष्ट्रीय विज्ञान दिन
==================================
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा,चिकित्सकवृत्ती,संशोधनवृत्ती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवेत.घरात,परिसरात, समाजात,शाळेत विद्यार्थ्यांना तशा संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात.

मुलांच्या मनात कुतूहल निर्माण व्हायला हवं.प्रश्न पडायला हवेत?यासाठी मुलांसोबत विविध विषयावर मनमोकळी चर्चा करायला हवी.विविध संदर्भस्त्रोत उपलब्ध करून द्यायला हवेत.

समाजातील,निसर्गातील घडामोडीचे निरीक्षण करणे.त्याबद्दल चिकित्सक विचार करणे.अंधश्रद्धा न बाळगता शास्त्रीय दृष्टीकोनातून प्रत्येक बाब समजून घेणे आवश्यक असते.विविध शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाच्या गोष्टी मुलांना सांगायला हव्यात. शास्त्रज्ञांची चरित्रे मुलांना वाचायला द्यायला हवीत.

समाजातील प्रत्येकानेच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपलं जगणं समृद्ध करायला हवं.

No comments:

Post a Comment