राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, बालसाहित्यिक समाधान शिकेतोड यांच्या जादुई जंगल या बालकादंबरीचे प्रकाशन शिवगौरी हॉल या ठिकाणी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे, प्रसिद्ध साहित्यिक,डॉ.बालाजी इंगळे, वरिष्ठ अधिव्याख्याता, डॉ. दयानंद जटनुरे,मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष नितीन तावडे,अधिव्याख्याता नारायण मुदगलवाड, यांच्या हस्ते संपन्न झाले.
जादुई जंगलातील गंमतीजमती सांगणारी, रोमहर्षक,मनोरंजक बालकादंबरी राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेली आहे.योगीता धोटे यांनी या बालकादंबरीचे आकर्षक मुखपृष्ठ तयार केलेले असुन कांदबरीसाठी सुंदर चित्रे काढलेली आहेत. ही बालकादंबरी एकशे चौतीस पृष्ठांची असुन मुलांच्या भावविश्वाला मोहिनी घालणारे प्रसंग,घटना,गंमतीजमती मन हरखून टाकतात.
समाधान शिकेतोड यांनी माझे विद्यार्थी हेच माझ्या साहित्य लेखनाची प्रेरणा आहे असे प्रतिपादन केले. जादूई जंगल या बालकांदबरीच्या निर्मीतीचा प्रवास त्यांनी उलगडून सांगीतला. या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक डॉ.बालाजी इंगळे यांनी या बालकादंबरीवर सविस्तर भाष्य केले. या कादंबरीत मुलांना आवडणारे भावविश्व रेखाटण्यात आलेले आहे. कादंबरीची भाषाशैली,रचना, कथानक उत्तम असून पुढे काय घडणार याबद्दल मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करणारे आहे. ही कांदबरी नक्कीच बालकांच्या पसंतीला उतरेल. मराठी साहित्य विश्वात ही बालकादंबरी निश्चितच आपले वेगळे स्थान निर्माण करेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कांबरीला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळातील असा आशावादही व्यक्त केला.
शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे यांनी या प्रसंगी प्रत्येकाने वाचन करायला हवे. वाचन संस्कृती रुजवायला हवी. असे आवाहन केले. समाधान शिकतोड यांची बालकादंबरी नक्कीच मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला. मुलांना सकस व दर्जेदार बालसाहित्य वाचनासाठी उपलब्ध करून द्यायला हवे असे आवाहन केले.
समाधान शिकेतोड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलांसाठी ते सातत्याने नाविन्यपूर्ण लेखन करत असतात. यापूर्वी त्यांचा पोपटाची पार्टी हा बालकवितासंग्रह वाचकांच्या पसंतीला उतरलेला आहे. विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी ते सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प राबवित असतात.
या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिक्षण विभागातील अधिकारी, मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक पालक, विद्यार्थी तसेच साहित्य रसिक उपस्थित होते.यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने बालसाहित्यिक समाधान शिकेतोड यांचा त्यांच्या रचनात्मक कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन हनुमंत पडवळ यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य रुपेशकुमार जावळे, अरविंद हंगरगेकर, हनुमंत पडवळ, तसेच तानाजी खंडागळे, विवेकानंद कदम,नेताजी चव्हाण,प्रवीण बनकर यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment