यानिमित्ताने चिमण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करूया.त्यांना दाणा-पाणी देऊया.आमच्या घराच्या गच्चीवर चिमण्याच्या दाणा-पाण्याची खास सोय केलेली आहे.आम्ही दररोज सकाळी चिमण्यासाठी तांदूळ टाकतो.पाणी भरून ठेवतो.
लहानपणी अंगणात येणारी चिऊताई आता दिसेनासी झालीय.आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण समृद्ध करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं बालकांच्या आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं गरजेचं आहे.
माझ्या पोपटाची पार्टी या बालकवितासंग्रहातील चिऊताई ही कविता.
चिऊताई
अंगणात एक
चिऊताई आली
पाण्यासाठी फार
कासावीस झाली
उन्हाळ्याच्या दिवसात
होते लाही लाही
थेंब थेंब पाण्यासाठी
चोची शोधतात काही
पशूपक्ष्यांसाठी हातात
नको काठी
अंगणात ठेवू
पाण्याची वाटी
दाणापाणी देऊन
त्यांची काळजी घेऊ
मानवतेची पताका
उंच उंच नेऊ
No comments:
Post a Comment