गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे चिंताग्रस्त आहे.प्रगत देशाची वाताहात आपणे दररोज पाहतोय.अशा वेळी प्रत्येकानं जबाबदारीने वागायला हवं.संयम बाळगायला हवा.कधी नव्हती अशी परिस्थिती जगासमोर निर्माण झाली आहे.
कोरोना विषाणू विरूद्ध डाॅक्टर,नर्स,पोलिस व इतर कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र परिश्रम घेत आहेत.शासनाला,प्रशासनाला सहकार्य करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे.
स्थलांतरित कुटुंबे,बेवारसपणे फिरणारे व्यक्ती,पोटापाण्यासाठी भटकंती करणारी कुटुंब,फिरस्ती मेंढपाळ,गुरे राखणारे जर आपल्या आसपास असतील तर त्यांना आहे तिथंच थांबवून खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक संवेदनशील नागरिकांनी,स्वयंसेवी संस्थांनी घ्यायला हवी.आज माणुसकीचे दिवस आलेत.माणसाने माणसावर माणूस म्हणून प्रेम करण्याचे दिवस आलेत.स्वतःच्या छोट्याशा कृतीनेही आपण देशासाठी काहीतरी चांगलं करत असो तो.आत्मकेंद्रीत न होता आजूबाजूच्या माणसांना मदत करण्याचे दिवस आलेत.
प्रत्येकानं घरात थांबायला हवं.स्वच्छता व सुरक्षिततेचे नियम सर्वांनी पाळायला हवेत.आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही असं वागायला हवं.आपल्यासाठी रात्रंदिवस जे रस्त्यावर आहेत.त्यांचे आभार मानायला हवेत.
हेही दिवस निघून जातील पण माणसाने माणसासारखं वागायला हवं.नक्कीच कोरोना विषाणूला आपण हरवू.
#मिच_माझा_रक्षक
No comments:
Post a Comment