शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी,मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी क्वेस्ट ही संस्था रचनात्मक काम करत आहे.भाषा गणित विषयाचे कार्यक्रम युनिसेफ व शासनाच्या मदतीने राबविलेले आहेत.नुकताच क्वेस्टने आठवडाभराचा ऑनलाईन कोर्स घेतला. 'समजून उमजून' या कार्यक्रमांतर्गत 'अंकुरती साक्षरता समजून घेताना' या विषयावर क्वेस्टचा ऑनलाईन अभ्यासवर्ग पुर्ण केला.
या अभ्यासवर्गात शिक्षणतज्ञ निलेश निमकर यांनी मार्गदर्शन केले.क्वेस्टच्या टिमने उत्तम नियोजन केले होतो.दररोज एका नविन संकल्पनेवर एक व्हिडिओ व लेख गटातील सदस्यांना वाचायला दिला जाई.दुस-या दिवशी त्यावर चर्चा होत असे.प्रत्यक्ष मुलांसोबत काम करताना आलेले अनुभव,नवीन शास्त्रीय दृष्टीकोनातून करावयाचे काम याबाबत गटातील सदस्य चर्चा करत.
लेखातील मुद्दे चर्चेतुन समजून घेतले जात असत.व्हिडिओ मध्ये प्रत्यक्ष मुलांसोबत केलेलं काम असे. त्यावरही चर्चा होत असे.क्वेस्टची Academic Team चर्चा चिंतनाच्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत.शेवटी शिक्षण तज्ञ निलेश निमकर सर सारांश रूपाने विषयाची मांडणी करत असत.
बालवयातील भाषा आणि साक्षरता,अंकुरती साक्षरता,वर्गामध्ये मजकूर समृद्ध वातावरण तयार करणे, लेखन कोपरा,वाचन कोपरा,तारेवरचे वाचनालय,सहभागी वाचन,प्रकटवाचन,भाषेतील आवाजांची जाणीव या विषयावरचे लेख व त्यावरील व्हिडिओ या आठवड्याभराच्या ऑनलाईन कोर्स मध्ये समजून घेता आले.मुलांचा प्रारंभिक भाषा विकास कसा होतो. याबद्दल सविस्तर माहिती समजली.मुलांसोबत शास्त्रीय दृष्टीकोनातून भाषाशिक्षणाचे अध्ययन अनुभव कसे द्यावेत.याबद्दल समजून घेता आले.
दुपारी एक तासभराच्या वेळत गटातील सर्व सदस्य चर्चेत सहभागी होत असत.यामध्ये शिक्षक व पर्यवेक्षिय अधिकारी सहभागी झालेले होते.सध्या लाॅकडाऊनच्या काळात स्वतःला समृद्ध करण्यासाठी या कोर्सचा नक्कीच खुप उपयोग झाला.नितीन मराडे,शालिनीताई, प्रल्हाद काठोळे या क्वेस्टच्या Academic Team ने या ऑनलाईन कोर्सचे खुप उत्तम व्यवस्थापन केले.
समाधान शिकेतोड
samadhanvs@gmail.com
No comments:
Post a Comment