Saturday 25 November 2023

घरोघरी ग्रंथालय

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई मार्फत राज्यातील प्रयोगशील शिक्षकांना पाठ्यवृत्ती (फेलोशिप) दिली जाते. या सर्व फेलोंची तीन दिवसीय कार्यशाळा बारामती येथे संपन्न झाली. राज्यातील प्रयोगशील शिक्षकांचे उपक्रम समजून घेता आले. बालाजी जाधव सातारा, विनीत पद्मावार गडचिरोली, सचिन देसाई कोल्हापूर, अण्णासाहेब घोडके बीड, मृणाल गांजळे पुणे अशा अनेक प्रयोगशील शिक्षकांचे उपक्रम अफलातून आहेत. या सर्वांचे सादरीकरण अनुभवता आले. या साऱ्या शिक्षकांच्या सहवासात राहून खूप काही नवीन शिकता आले. आदरणीय शिक्षणतज्ञ डॉ. ह.ना.जगताप, आदरणीय डॉ. किडगांवकर सर, MKCL चे संचालक आदरणीय विवेक सावंत यांचे मार्गदर्शन मिळाले.

 बारामतीमधील सायन्स सेंटर, कृषी विज्ञान केंद्र, विद्या प्रतिष्ठान अशा वेगवेगळ्या संस्थांना भेटी दिल्या. बारामती मधील सायन्स सेंटर खूप छान आहे. या सेंटरला नक्की भेट द्यायला हवी. या क्षेत्रभेटीमध्ये खूप काही नवीन पाहायला, अनुभवायला मिळाले. राज्यभरातील आलेल्या प्रयोगशील शिक्षकांसाठी संगीतरजनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम खूपच छान होता. गेले तीन दिवस खूप मस्त गेले. 

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाच्या संपूर्ण टीमने या कार्यशाळेसाठी खूप परिश्रम घेतले. त्यांचे खूप खूप आभार.
.            नवोपक्रमचे सादरीकरण करताना....

No comments:

Post a Comment