Monday 30 October 2023

शिक्षक म्हणून 20 वर्षे सेवा पूर्ण

प्राथमिक शिक्षक म्हणून २० वर्षे सेवा पूर्ण झाली. २००३ ते २०२३ हा शिक्षक म्हणून प्रवास आनंदायी आहे.मुलांसोबत सर्जनशील काम करता आलं. 

नौकरीच्या सुरूवातीलाच नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागात केलं. बहुभाषिक शिक्षणाचं आव्हानात्मक काम करताना बोलीभाषा-प्रमाणभाषा शब्दकोश तयार केला. यामुळे मुलांना घरच्या भाषेकडून माध्यम भाषेकडे घेऊन जाता आले. यावेळी टिचर पुस्तकाकडून प्रेरणा मिळाली अन् काम करत गेलो.

धाराशिव जिल्ह्यात बदली झाल्यानंतर हाडोंग्रीची शाळा लोकसहभागातून समृद्ध केली. भाषाशिक्षणाचे प्रयोग केले. तंत्रज्ञानाचा उपयोग अध्ययन अनुभवात सुरू केला. स्वतःचा शिक्षण संवाद नावाचा ब्लाॅग लिहू लागलो. राज्यातील प्रयोगशील शिक्षकांच्या कार्यानं प्रेरीत झालो.राज्यभर खूप मोठा मित्रपरिवार मिळाला. 

मुलांसोबत काम करताना लिहता झालो.आज बालसाहित्यावर चार पुस्तके झाली. हे साहित्य लिहण्याची प्रेरणा मुलेच आहेत.मुलांसोबत काम करताना खूप समृद्ध झालो. या वीस वर्षांचा प्रवास आनंददायी आहे. या प्रवासात खूप सारे प्रयोगशील शिक्षक, प्रयोगशील अधिकारी भेटले. माझ्या एकंदरीत जडणघडणीत त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. 

मी शिक्षक असल्याचं खूप समाधान मिळतं. या लेकरांना घडवताना वीस वर्षांचा प्रवास कधी संपला ते कळलही नाही.आज मी खूप समाधानी आहे.

No comments:

Post a Comment