आपला पाल्य किती वेळ मोबाईल वापरतो, त्या मोबाईलवर काय पाहतो हे प्रत्येक पालकाने नियमितपणे पाहिले पाहिजे. मुले मोबाईल गेम खेळत असतील तर त्यांना त्यापासून पराभूत करायला हवे. अगदी शिशु अवस्थेपासून आपण मुलांना मोबाईल देतो. मुल जेवण करत नसेल तर त्याला कार्टून लावून देतो व जीव घालतो. एखादा पाहुणा, मित्र आला असेल आणि लहान मूल त्या बोलण्यात येते आणत असेल तर त्याला आपण त्यावेळी मोबाईल देतो. आई मुलाला मोबाईल देऊन घरातली कामे करत असते असे सर्रास घडते. त्यामुळे मुलाला शिशुअवस्थेपासूनच मोबाईलची आवड निर्माण होते. बाल आणि कुमार अवस्थेतील जी मुले आहेत तेही मोबाईल पाहत असतात. मुले मोबाईलवर कोणत्या गोष्टी पाहतात यावर पालकांचे नियंत्रण नसते. ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली इतर काय काय मोबाईलमध्ये पाहिले जाते. याकडे पालकांनी बारकाईने लक्ष द्यायला हवे. स्वतःचा मोबाईल वेळोवेळी तपासला जावा त्यामध्ये काही नवीन मोबाईल गेम्स डाउनलोड केलेले आहेत किंवा नाही हे पाहायला हवे. मुले दरवाजा लावून एकट्याने मोबाईल पाहत असतील तर तसे त्यांना करू देऊ नये. बंद दार मुले मोबाईल मध्ये काय पाहतात याचा थांब पत्ताही पालकांना लागत नाही त्यामुळे मग मुले मोबाईल मध्ये गेम पाहून त्याच्या आहारी जातात.
मोबाईलपासून सुटका करून घेण्यासाठी पुस्तक वाचन हा चांगला पर्याय आहे. त्यासाठी मुलांना पुस्तके उपलब्ध करून द्यायला हवी मुलांसोबत पुस्तकाचे वाचन करायला हवे पुस्तकावर गप्पा मारायला हव्यात. त्यामुळे मुले मोबाईल गेम खेळण्याचे ऐवजी पुस्तकात रमतील त्यांचे भविष्य उज्वल आणि समृद्ध होईल.
No comments:
Post a Comment