Thursday, 27 October 2022

घड्याळ गप्पा


घड्याळातील वेळ मुलांना समजावी यासाठी वर्गात घड्याळ हवं. यासाठी वर्गात नवीन घड्याळ लावायचं ठरवलं होतं. पण राहून गेलं होतं. बायकोनं ऑनलाइन घड्याळ मागवून घेतलं व मला दिलं. 

वर्गात घड्याळ लावल्यावर मुलं खूश झाली. घड्याळात किती वाजले यावर चर्चा करू लागली.काही मुलांना घड्याळातील वेळ अचूक समजत नव्हती. आता मुलं घड्याळातील वेळ त्यांच्याच मित्राच्या मदतीनं समजून घेत आहेत.नक्कीच सर्व मुलं घड्याळातील वेळ अचूक सांगतील. 

मुलांच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी वर्गातील वातावरण अध्ययन समृद्ध हवं. साहित्याच्या मदतीनं मुलांना शिकण्याच्या संधी मिळायला हव्यात.

No comments:

Post a Comment