Tuesday, 8 March 2022

माझी शाळा माझा अभिमान

गेले पाच वर्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद या ठिकाणी शिक्षक प्रशिक्षण म्हणून कार्यरत होतो. या कालावधीत जिल्ह्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. मराठी विषयाचे विविध पथदर्शी प्रकल्प उपक्रम राबविले.
नुकतीच मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी तालुका उस्मानाबाद या शाळेवर नियुक्ती मिळालेली आहे. नव्या उत्साहाने उमेदीने या शाळेवर काम सुरू केलेले आहे.कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची अध्ययन क्षती झालेली आहे. बरेच विद्यार्थी अजूनही शाळेत येत नाहीत. अध्ययन स्तर निश्चिती केल्यानंतर असे आढळून येत आहे की बहुतांशी मुलांना भाषा व गणित विषयातील मूलभूत क्षमता प्राप्त नाहीत. मुलांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यावर काम सुरू करणार आहे. पालकभेटी घेऊन प्रत्येक मुल नियमितपणे शाळेत येईल यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेत वर्गात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प राबविण्याचे नियोजन करत आहे. शालेय वर्ग वातावरण अध्ययन समृद्धी असावे यासाठी वर्ग सजावट, वर्गरचना ज्ञानरचनावादी पद्धतीने करत आहे. मी इयत्ता दुसरी व तिसरी च्या वर्गासाठी अध्यापन करीत आहे. वर्गातील विद्यार्थी आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, गुणवत्ता वाढीसाठी अविरतपणे प्रयत्न सुरू ठेवणार आहे. वर्गात वाचन कोपरा, लेखन कोपरा, अभिव्यक्ति फलक तयार करणार आहे. मुलांना साहित्याच्या आधारे अध्ययन अनुभव घेता येईल या पद्धतीने शैक्षणिक साहित्याचे व्यवस्थापन करत आहे.
शाळा भौतिक सुविधांनी संपन्न व्हावी, यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन शाळा समृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बालाजी अमाईन्स यांच्याकडे स्वच्छतागृह व इतर भौतिक सुविधांसाठी पाठपुरावा करत आहे.

             जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी

No comments:

Post a Comment