Sunday, 6 March 2022

आता प्रतिक्षा संपली...

 राजहंस प्रकाशनाकडून पाठवलेले कुरीअर मिळालं.माझी जादूई जंगल ही बालकांदबरी पाहण्यासाठी मी उत्सुक होतो.

 या बालकांदबरीच्या लेखकासाठीच्या भेट प्रती मिळाल्या.पुस्तक खुपच सुंदर झालंय.राजहंसच्या संपूर्ण टिमनं खूप मेहनत घेतली आहे.योगीता धोटे यांनी काढलेलं मुखपृष्ठ व आतील चित्रे मन वेधून घेतात.

सोबतच आदरणीय सदानंद बोरसे सरांचं अभिनंदन पत्रही मिळालं.पत्र वाचून नवीन उर्जा मिळाली.

आता प्रतिक्षा संपली....
लवकर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू होत आहे. राजहंसच्या संपूर्ण टिमचे मनापासून आभार.

No comments:

Post a Comment