गेल्या पाच वर्षात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम करताना अनेक स्वयंसेवी संस्थांशी संबंध आला. त्यांच्या सोबत काम करताना परिचय झाला. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाळेत भौतिक सुविधा उभ्या कराव्यात असा निश्चय केला आहे. त्यादृष्टीने काम सुरू केले आहे.अनेक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधने सुरू आहे.
तुळजापूर येथील टाटा सामाजिक संस्थेतील आमचे मित्र श्री. गणेश चादरे यांच्याशी संपर्क केला. शाळेतील वस्तुस्थितीबाबत अवगत केले. त्यांनी भौतिक सुविधांनी शाळा समृद्ध करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे सांगितले. सोलापूर येथील बालाजी अमाईन्स या कंपनीकडे प्रस्ताव पाठवा असे सांगितले. शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन लगेच मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीसह शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रस्तावना पाठवून दिला.
शाळेतील मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी धडपड सुरू आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी शाळेत विविध अध्ययनस्त्रोत उपलब्ध व्हावेत. शालेय व वर्गवातावरण अध्ययन समृद्ध व्हावे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती व सहकारी शिक्षक यांच्या माध्यमातून शाळा समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत.
No comments:
Post a Comment