मुलांच्या आयुष्यात गोष्टींना महत्वाचे स्थान असते.मुलांच्या भाषा विकासाचे व साक्षरता विकासाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे.मुलांना त्या नियमितपणे सांगितल्या किंवा वाचून दाखविल्या पाहिजेत.मुलांना त्यातून आनंद मिळातो,भाषा कशी वापरली जाते ते समजते.मुलांचा भावनिक विकास होतो,त्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला धुमारे फुटतात.मुलांना पुस्तक वाचण्याची गोडी लागते.याबाबत टि.बी.लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आणि टायनी टेल्स आयोजित 'वाचू आनंदे' ही ऑनलाईन कार्यशाळा दिनांक २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत संपन्न झाली.
या कार्यशाळेत पालक,शिक्षक,शिक्षक प्रशिक्षक सहभागी झालेले होते.भाषाशिक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब लिबींकाई,गोष्टरंग टिम मधील प्रतिक्षा खासनीस,कल्पेश समेळ,महेंद्र वाळुंज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत स्वतः सक्रिय सहभागी होणे अपेक्षित होते.मार्गदर्शकांनी गोष्ट कशी सांगावी याचे सादरीकरण करून दाखवले.आवाजासाठीचे व्यायाम,आवाजाची पट्टी,चढ-उतार,स्वराघात,विरामचिन्हांचा वापर कसा करावा याबद्दल प्रात्यक्षिकासह समजून घेता आले.
लहान मुलांना गोष्टी का सांगाव्यात.याबाबत ताराबाई मोडक यांनी सांगीतलेल्या बाबींची चर्चा करण्यात आली. या संदर्भातील संदर्भ साहित्य वाचायला मिळाले. वेगवेगळे लेख याबाबतची समज पक्की करण्यासाठी उपयुक्त ठरले.
लहान मुलांसाठी वयोगटानुसार पुस्तकांची निवड कशी करावी. मुलांना लेखी भाषेची जाण व्हावी यासाठी पुस्तकाचे सहभागी वाचन कसे घ्यावे. याबाबतचे काही पुस्तकांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.सहभागी वाचन करताना आवाजातील चढ उतार,आवाजाची पट्टी,आवाजाची गती व भावना वाक्यानुसार कशा ठेवायला हव्यात.याबाबत सर्वांकडून सराव करून घेण्यात आला.घरातील लहान मुलांनीही या गोष्टींचा आस्वाद घेऊन मजा घेतली.
भाषाशिक्षण,बालसाहित्य आणि शिक्षणशास्त्र या सगळ्यांचा एकत्रित विचार करणारी कार्यशाळा होती.दररोज सहभागीसाठी स्वाध्याय दिला जात होता.प्रत्येकाला मेटाॅर त्याबद्दल मार्गदर्शन करत असत.या कार्यशाळेत खुप नविन शिकायला मिळालं.
समाधान शिकेतोड
www.shikshansanvad.in
खूप छान आपले उपक्रम आणि मार्गदर्शन मला युट्युब वरती शिक्षण गप्पा या कार्यक्रमातून मिळाले. धन्यवाद सर आणि आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteआपली हेरंब कुलकर्णी सरां बरोबरची मुलाखत ऐकली.खूपच छान काम करत आहात , सर.मी पण एक प्राथमिक शिक्षिका आहे.मराठीभाषेची मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून खूप प्रयत्न करते.माझेही अनेक विद्यार्थी छान तयार होत आहेत आणि याचे मला समाधान वाटते.आपली यशस्वी घोडदौड अशीच पुढे पुढे जावी हीच सदिच्छा.
ReplyDeleteसर्वांचे मनापासून आभार.
ReplyDelete