Friday, 6 March 2020

जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठक संपन्न

🌈जिल्हा गुणवत्ता कक्षाची बैठक संपन्न🌈 
 ============================
स्थळ-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद. 
दिनांक- 6 मार्च 2020

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत व निती आयोगांतर्गत मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.आज मा.डाॅ.संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुणवत्ता कक्षाची बैठक संपन्न झाली.यावेळी मा.डाॅ.इब्राहिम नदाफ,प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद,मा.रोहिणी कुंभार,उपशिक्षणाधिकारी,मा.अधिव्याख्याता, मा.गटशिक्षणाधिकारी, विषय सहायक,समुपदेशक व जिल्हा समन्वयक उपस्थित होते.*
 
📌 निती आयोगाचे दर्शक,NAS सराव चाचणी -3 चे विश्लेषण,OTS परीक्षा विश्लेषण,अॅस्ट्राॅनाॅमी क्लब,ग्रंथालय,प्रयोगशाळा,तालुक्यातील बेस्ट प्रॅक्टीसेस याबद्दल सर्व तालुक्याचे सादरीकरण झाले.
📌 मा.किशोरी जोशी,शिक्षण विस्तार अधिकारी,पं.स.उस्मानाबाद  यांनी स्वतःच्या बीटमधील सर्व शाळांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अॅस्ट्राॅनाॅमी क्लब स्थापन करणार असुन त्याबद्दल काम सुरू आहे.या कामाबाबत सविस्तर प्रेरणादायी माहिती सांगीतली.सर्वंच तालुक्याच्या सन्माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी आपआपल्या तालुक्यात काही शाळांमध्ये अॅस्ट्राॅनाॅमी क्लब स्थापन करणार असल्याचे सांगितले.मा.किशोरी जोशी यांच्या बीटमध्ये अॅस्ट्राॅनाॅमी क्लब स्थापन करण्याबद्दल केलेले कार्य कौतुकास्पद आहे.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.त्यांच्या बीटमध्ये मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत.याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. 
📌 मार्चच्या शेवटच्या आठवड्यात NAS-4 सराव चाचणी घेण्याचे ठरले.
📌 मा.प्राचार्य यांनी SLAS,NAS, शिक्षणोत्सव,मुलांच्या Innovation बद्दल अविष्कार कार्यशाळा याबद्दल मार्गदर्शन केले. 
📌 मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी यांनी सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.निती आयोगातील सर्व दर्शकांची पुर्तता करणे.शाळांमध्ये अॅस्ट्राॅनाॅमी क्लबची स्थापना करणे.ग्रंथालये समृद्ध करण्यासाठी NBT ( https://www.nbtindia.gov.in/ ) चे सदस्य सर्व शाळांनी होणे.मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी,NAS मधील मुलांची संपादणूक वाढविण्यासाठी   विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे.याबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले. 
📌 जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीचे प्रास्ताविक मा.नारायण मुदगलवाड,अधिव्याख्याता व आभारप्रदर्शन मा.बिरप्पा शिंदे,अधिव्याख्याता यांनी केले.

                    

1 comment:

  1. श्री.दिपक बेलवले .
    jyotideepakbelawale.blogspot.in

    ReplyDelete