प्रसिद्ध साहित्यिक तथा पत्रकार मा. श्री.रविंद्र केसकर यांनी आज उस्मानाबाद येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने निष्ठा प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. "वैज्ञानिक दृष्टिकोन" या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
प्रत्येकानं जगताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जगायला हवं.संविधानीक मुल्ये जपायला हवी. विद्यार्थ्यांनी चिकित्सक विचार करायला हवा.त्यांच्यात संशोधनवृत्ती वाढीस लागायला हवी.याबद्दल जीवनव्यवहारातील उदाहरणे देऊन विषयाची खुमासदार शैलीत मांडणी केली. गॅलिलीयो पासून रविंद्रनाथ टागोरांपर्यत विज्ञानातील शाश्वत सत्य,तत्वांची मांडणी केली. विज्ञान समजून घ्यायला हवं.निसर्ग समजून घ्यायला हवा. यासाठी स्वतःला समृद्ध करण्यासाठी शिक्षकांसाठी अनेक संदर्भ ग्रंथाची यादी शिक्षकांना सांगीतली.
वास्तव घटनेवर प्रकाश टाकणा-या,दांभिकतेवर प्रहार करणा-या कविता म्हणून दाखविल्या. मा.श्री.रविंद्र केसकर यांचे आजचे व्याख्यान सर्वांना खुपच भावले.चेतना,नवउर्जा,प्रेरणा देणारे ठरले.
No comments:
Post a Comment