आज आमच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील मराठी भाषा विभागाच्या टीमने तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडपट्टी देवसिंगा तूळ या शाळेला भेट दिली.शाळा खूप छान आहे.या शाळेमध्ये अध्ययन निष्पत्ती आधारित मराठी विषयातील पाठाचे मुलांना कशा पद्धतीने अध्ययन अनुभव घ्यावेत यासाठी प्रत्यक्ष कृती करून पाहिल्या.मुलांशी संवाद साधला. शाळेमध्ये प्रत्येक वर्गात छान वाचन कोपरा तयार केलेला आहे.वर्गातील वातावरण अध्ययन समृद्ध आहे. वर्गांतरक्रिया गट पद्धतीने(group learning),जोडी पद्धतीने(pair learning) होत असतात.त्यामुळे अध्ययन निष्पत्ती आधारित वर्ग आंतरक्रिया खूप छान पद्धतीने याठिकाणी होत आहे.आज या शाळेला भेट देऊन उपक्रमशील शिक्षकांना भेटून, मुलांशी संवाद साधून खूप आनंद वाटला.
इयत्ता चौथीतील होय मी सुद्धा या पाठाचे अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव कसे द्यावेत याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या पाठासाठी किमान चार तास एक पाठासाठी लागतात.या प्रत्येक तासामध्ये प्रत्येक कृती कशा पद्धतीने मुलांसोबत घेतली जावी.यासाठी अध्ययन स्त्रोतांचा आणि वर्गातील अध्ययनसमृद्ध वातावरणाचा कशा पद्धतीने वापर करावा. या कृती मागचा शास्त्रीय विचार या सगळ्या बाबींचा आम्ही व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न केला. या महिन्यात होणारी शिक्षण परिषद अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव या विषयावर उस्मानाबाद जिल्ह्यात संपन्न होणार आहे यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत.
Tuesday, 10 December 2019
शाळा भेट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment