Sunday 7 January 2024

व्हाट्सअप पोल

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना अध्ययन अनुभव दिल्यामुळे आज मुले गतीने शिकत आहेत. माझ्या वर्गात इंटर ऍक्टिव्ह बोर्ड आहे. या बोर्डच्या साह्याने विविध विषयातील अवघड संकल्पना मुलांना समजून द्यायला सोपे जाते. मुलांना गतीने शिकण्यासाठी या बोर्डचा उपयोग होत आहे.

अलीकडेच मी शिष्यवृत्तीच्या ग्रुपवर व्हाट्सअपमधील व्हाट्सअप पोल च्या मदतीने मुलांना बहुपर्यायी प्रश्न देत आहे. मुले त्या प्रश्नाची उत्तरे देतात. मला कोणत्या विद्यार्थ्याने उत्तरे बरोबर दिली. कोणत्या विद्यार्थ्यांचे उत्तरे चुकले हे समजते. चुकलेली उत्तरे का चुकली याबद्दल त्या प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण मुलांना मी दुसऱ्या दिवशी देतो. त्यामुळे मुलांचा त्या प्रश्नांचा सराव होत आहे.

अवघ्या काही मिनिटात व्हाट्सअप चा प्रश्न तयार करता येतो. व्हाट्सअप च्या ग्रुप वर पाठविता येतो. त्या प्रश्नावरील मुलांचे प्रतिसाद आल्यानंतर त्या प्रश्नाचे विश्लेषण करून मुलांना त्याबद्दल सांगता येते. व्हाट्सअप वरील व्हाट्सअप पोल च्या माध्यमातून मुलांचे शिकणे गतीने होत आहे. अशा अध्ययन स्त्रोताच्या माध्यमातून मुलांच्या शिकण्याला गती द्यायला हवीच.


No comments:

Post a Comment