Tuesday 16 May 2023

विज्ञान शैक्षणिक सहल

आमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची विज्ञान शैक्षणिक सहल जिल्हा परिषद प्रांगणातून निघाली. या विज्ञान सहलीला परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. मा.जिल्हाधिकारी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सहलीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी खूप आनंदी होते. त्यांना सहलीची उत्सुकता लागलेली होती. विमानाने प्रवास करून अंतरिक्ष केंद्र श्रीहरी कोट्टा येथे उपग्रह प्रक्षेपणाचा अनुभव विद्यार्थी घेतील. केरळमधील थुंबा येथे स्पेस रिसर्च सेंटरही पाहतील. 

मा.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.शिक्षणाधिकारी व इतर अधिकारी विद्यार्थ्यांसोबत सहलीमध्ये सहभागी आहेत. या विज्ञान सहलीमधून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे पालकही निरोप देण्यासाठी आले होते. त्यांनाही खूप आनंद झाला होता.

आमच्या शाळेतील भक्ती दर्लिंग बेलदार ही विद्यार्थीची या विज्ञान सहलीत निवड झालेली आहे. तिला निरोप देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आलेले होते. भक्तीला खूप खूप शुभेच्छा. भक्तीला ही संधी मिळणे ही आमच्या शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.

#माझी_शाळा_माझा_अभिमान 
#विज्ञान_सहल
#विमान_भरारी

No comments:

Post a Comment