Saturday 25 February 2023

बैठक शालेय व्यवस्थापन समितीची

आज शालेय व्यवस्थापन समितीची बैठक खूपच छान झाली. गेले वर्षभर ग्रंथालयावर आधारित उपक्रम राबविण्यात आले होते. त्या उपक्रमांच्या संदर्भात सादरीकरण केले. विद्यार्थी पुस्तक वाचून छान पुस्तक परिचय लिहीत आहेत. इयत्ता चौथी ते आठवीमधील विद्यार्थ्यांनी जवळपास चाळीस पुस्तक परिचय लिहले आहेत. काही विद्यार्थ्यांनी इतकं अप्रतिम लिहलंय की वाचतंच रहावंस वाटतं. शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थीच ग्रंथालयाचं व्यवस्थापन करतात. शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी या मुलांचे कौतुक केले. 

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं उत्कृष्ट वाचक, उत्कृष्ट पुस्तक परिचय लिहणारे विद्यार्थी,ग्रंथालयाचं व्यवस्थापन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा ठरलं.

शाळा, शिक्षक, पालक, व्यवस्थापन यांच्यातील सुसंवाद वाढत आहे. मुलांच्या शिकण्यासंदर्भात चर्चा होत आहे. गावात संध्याकाळी काही तरूण स्वयंसेवक मुलांना अतिरिक्त पुरक मार्गदर्शन करतात. त्यामुळेच अभ्यासात पाठीमागे असणारी मुले गतीनं पुढं जात आहेत. सर्व शिक्षक एकजुटीनं मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी झटत आहेत.

या बैठकीला काही स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधीही हजर होते.त्यांनीही मुलांचं, गावाचं कौतुक केलं. शाळेतील प्रत्येक वर्गात एलईडी टिव्ही बसवण्याबाबत चर्चा झाली. शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तक व कपाट घेण्याबाबत चर्चा झाली. बैठक गुणवत्तापुर्ण शिक्षणाच्या अंगाने समृद्ध चर्चा घडत संपन्न झाली.

No comments:

Post a Comment