Monday 13 December 2021

साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक -२०२१

साने गुरूजींनी सुरू केलेले साधना साप्ताहिक गेली ७४ वर्षे अखंड प्रकाशित होत आहे.गेल्या चौदा वर्षापासून बालकुमार दिवाळी अंक प्रकाशीत होत आहे.मागील सलग चार वर्षे ,'देशविदेशातील मुले-मुली' अशी थिम घेऊन बालकुमार अंक काढलेले आहेत. 

या वर्षीचा बालकुमार अंक देश-विदेशांतील बालचित्रपटावर आधारीत आहे. किल्ला (मराठी,महाराष्ट्र), द ब्लू अम्ब्रेला,(हिंदी-भारत), कलर ऑफ पॅराडाईज,(पार्शीयन,इराणी), व्हेअर इज द फ्रेंडस् हाऊस,(पार्शीयन,इराणी) (पार्शियन,इराणी) फोरपा/द कप, (हिंदी-तिबेट,भूतान) बाॅय इन द स्टाइपड पजामाज (इंग्रजी,ब्रिटन) या सहा बालचित्रपटाविषयीचे लेख या अंकात देण्यात आलेले आहेत.हे सहा लेख वाचल्यावर ते सहा चित्रपट आज ना उद्या पाहिलेच पाहिजेत अशी इच्छा वाचकांच्या मनात निर्माण होते.

उस्मानाबाद तालुक्यातील जि.प. के.प्रा.शाळा चिलवडी या शाळेतील विद्यार्थ्यांना या वर्षीचे साधनाचे बालकुमार दिवाळी अंक भेट दिले. माझा गेल्या चार -पाच वर्षापासून शाळांना साधनाचे अंक भेट देण्याचा वाचन उपक्रम अखंड सुरू आहे. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी,दर्जेदार पुरक वाचन साहित्य उपलब्ध व्हावे.यासाठी मुलांना साधना,किशोर यासारखे दर्जेदार बालकुमार दिवाळी अंक उपलब्ध करून द्यायला हवेत.

याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद मधील मराठी विभाग प्रमुख मा.नारायण मुदगलवाड, केंद्रप्रमुख मा.निलेश नागले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी हा अंक कसा वाटला याबद्दल लिहणार आहेत..

No comments:

Post a Comment