Sunday 11 October 2020

आंतरजाल उपक्रमांच्या माध्यमातून समृद्धीकरण

नववी कुमारभारती या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील सर्व पाठ कविता, व्याकरण, उपयोजित लेखन या घटकावर राज्यातील मराठी विषयाच्या उपक्रमशील माध्यमिक  शिक्षकांनी महाराष्ट्र मराठी अध्यापक मंडळाच्या माध्यमातून झूम ॲपच्या आधारे सादरीकरण केले.पाठाच्या सादरीकरणाचे व्हिडिओ एकत्रित संकलित करून त्याचे ई- बुक तयार करण्यात आले. प्रयोगशील माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षकांच्या समृद्धीसाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविला हा एक रचनात्मक प्रयोग आहे.तो निश्चितच दिशादर्शक व मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. 

राज्यातील मराठी विषयाचे उपक्रमशील माध्यमिक शिक्षक महाराष्ट्र मराठी अध्यापक समूहाच्या माध्यमातून एकत्रित आले. त्यांनी स्वतःच्या समृद्धीसाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पाठ्यपुस्तकातील पाठ्यघटकांचे १०ऑगस्ट ते २१ सप्टेंबर २०२० या कालावधीत सादरीकरण केले. या उपक्रमाची सुरुवात रोज सकाळी साडेसात होत असे. गटातील सर्व शिक्षक झूम ॲप च्या आधारे एकत्र येत. भाषा विषयातील तज्ञ शिक्षक एका घटकाचे सादरीकरण  करत असत. गटातील सहभागी शिक्षक त्यावर चर्चा करत असत. मुलांना भाषा शिक्षणात येणाऱ्या अडचणी, पाठ्यघटक समजण्यात येणाऱ्या अडचणी, उपयोजित लेखन करताना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा होत असे.

 त्याचबरोबर इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील लेखक,कवींनी शिक्षकांची संवाद साधला.श्री.राजीव बर्वे,श्री.सतीश काळसेकर, श्री.स्टॅन्ली गोन्साल्विस, श्री.तुकाराम धांडे,श्रीमती माधवी शानबाग या साहित्यिकांनी शिक्षकांशी संवाद साधला. पाठामागील भूमिका पाठाचा,आशय यावर चर्चा करण्यात आली.श्री.समाधान शिकेतोड, श्री.मोहन सिरसाट,श्री.नामदेव एडके,श्री. रवींद्रदादा डोंगरदिवे या राज्य अभ्यास मंडळ सदस्यांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.शिक्षकांशी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन केले.

उपक्रमशील माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येऊन मराठी विषयातील पाठ्यघटक विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने कसे शिकवावेत. मुलांना भाषिक क्षमता प्राप्त होण्यासाठी मुलांसोबत कशा पद्धतीने काम करावे. याबाबत शास्त्रीय चर्चा आयोजित केली जात होती. स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने शिक्षक यामध्ये सहभागी होत होते. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी कशा पद्धतीने मुलांसोबत काम करता येईल यावर विचारमंथन, चर्चा, नियोजन करण्यात येत होते. खरंच! हा उपक्रम स्तुत्य व कौतुकास्पद आहे.

  या उपक्रमाची पाठराखण पद्मश्री पोपटराव पवार, शिक्षण सहसंचालक श्री.दिनकर टेमकर, शिक्षणतज्ञ श्री.अनिरुद्ध जाधव, उस्मानाबाद डायटचे प्राचार्य श्री.बळीराम चौरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील विभाग प्रमुख श्री.दत्तात्रय मेंढेकर, मराठी विभाग प्रमुख श्री.नारायण मुदगलवाड यांनी केलेली आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींनी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केलेले आहे.

या संपूर्ण उपक्रमाच्या कार्यवाहीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे उपक्रमशील शिक्षक श्री.भागवत घेवारे,उस्मानाबाद,श्री.रंगनाथ सुंबे,अहमदनगर यांनी यासाठी सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी केला.यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांना समुहातील शिक्षकांनी उत्तम साथ दिली. ई-बुकच्या निर्मितीमध्ये तंत्रस्नेही शिक्षक श्री.गोरक्षनाथ शिंदे,अकोले,श्री.विजयकुमार सरगर,कोल्हापूर,श्री.शिवसांब कल्याणकस्तुरे,नांदेड यांनी योगदान दिले. या उपक्रमात सादरीकरण झालेल्या पाठ्यघटकांचे ई-बुक तयार करण्यात आलेले आहे. त्याचा उपयोग राज्यातील सर्व भाषाशिक्षकांना होईल

'आम्हा एकच ध्यास गुणवत्ता विकास' हे ब्रिद घेऊन स्वतःच्या समृद्धीसाठी व मुलांच्या भाषासमृद्धीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्या-या या सर्वांचा अभिमान वाटतो. 

3 comments:

  1. समाधान सरांनी, अगदीच उत्तम दखल या उपक्रमाची घेतली आहे. ब्रीद अंगीकारले की उत्तम निपजले जाते. याचे हे उदाहरण होय. खूप धन्यवाद सर.

    ReplyDelete