Monday 29 June 2020

चित्रांना चष्मा लावला!

मुलांचं अनौपचारिकपणे भाषा शिकणं सुरू असतं. अनुकरण,विश्लेषण,तुलना,अनुमान करणे ह्या बाबी त्याच्या सुरू असतात.मुलं आपले विचार स्वतःच्या लिपीतून मांडतातही.ती कृती,त्याची स्वलिपी समजून घेण्याची गरज असते.त्याच्या भाषा शिकण्याकडं डोळसपणे पाहून मुलाला प्रोत्साहन देण्याची गरज असते.असाच एक परवाचा अनुभव

माझा मोठा आर्यन इयत्ता सहावीत आहे तर छोटा मुलगा कौस्तुभ चार वर्षाचा आहे.आर्यनने माझ्या 'पोपटाची पार्टी' या बालकवितासंग्रहातील काही कवितांवर चित्रे काढली होती.आर्यन खूप छान चित्रं काढतो. प्रत्येक कवितेला एक साजेसं छान चित्र त्यांना काढलं होतं.मलासुद्धा ती चित्रं खूप आवडली होती. 
 तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "पप्पा, बघा माझी चित्रं कशी करून टाकलीत कौस्तुभनं"

मी पाहिलं तर प्रत्येक चित्राच्या डोळ्यांभोवती कौस्तुभनं पेनने गोल केलं होतं.नंतर आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो.तेव्हा मला त्या चित्रांची आठवण झाली.
त्याला प्रेमाने म्हटलं, "बाळा चित्रांच्या डोळ्यांना का गोल केलं बरं." 
तो म्हणाला, "मला करू वाटलं म्हणून केलं."
 मग त्याला विचारलं, पिल्लू सगळ्या चित्रांचे डोळ्यांनाच का बरं गोल केलं."
 मग तो म्हणाला, "पप्पा मी त्यांना चष्मा लावलाय" मग मात्र मला खूप आनंद वाटला कारण ती त्याची अभिव्यक्ती होती.त्यानं प्रत्येक चित्राला चष्मा काढला होता.त्याचं डोळे गिरगटून टाकणं तसं कुणालाचं आवडलं नव्हतं.एवढी सुंदर चित्रं खराब झाली.हीच भावना सर्वांच्या मनात होती.पहिल्यांदा त्याला थोडसं रागावलोही पण त्यानं प्रत्येक चित्राच्या डोळ्यालाचं गोल केल होतं.त्यांच्याशी गोड बोलून, त्याची उकल केल्यावर समजलं की ती तर त्याची अभिव्यक्ती होती.मुलं भाषा शिकत असतात फक्त आपण त्यांच्या प्रत्येक कृतीकडे डोळसपणे पाहायला हवं.
                 आर्यनने काढलेेली चित्रे 

No comments:

Post a Comment