Friday 24 February 2017

मराठी भाषा समृद्धीकरण कार्यक्रम कार्यशाळा

एका उपक्रमशील शिक्षकांची कार्यशाळेबद्दलची प्रतिक्रीया .........

*मराठी भाषा समृद्धीकरण कार्यक्रम कार्यशाळा* 📚

🌴🌱🌱🌴🌿☘🌱
दिनांक 21.02.2017 रोजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था (DICPD) उस्मानाबाद येथे
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांची *मराठी भाषा समृद्धीकरण कार्यक्रम एकदिवसीय कार्यशाळा*
अायोजित करण्यात अाली होती.सदर कार्यशाळेत मराठी भाषा समृद्धीसाठी  क्षेत्रनिहाय विविध उपक्रमांची चर्चा करण्यात अाली अाहे.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विचार करुण चर्चेअंती काही निवडक प्रभावी उपक्रम राबवण्याचे अायोजिले अाहे.......
       अाजच्या या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राला सकाळी ठिक १०:३० ला सुरुवात झाली अाहे.मा. धुमाळ सर(जेष्ठ अधिव्याख्याते) यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले.त्यानंतर मा.शेख सर (प्राचार्य)यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये जिल्ह्याची वास्तवदर्शी शैक्षणिक स्थिती अाकडेवारी स्वरुपात पीपीटीच्या साह्याने मांडली.राज्याचा विचार करता *स्वअभिव्यक्ती*क्षेत्रामध्ये अापल्याला सरस कामगीरी करणे अपेक्षित अाहे असे नमूद केले.अापल्या प्रभावी शैलीत मार्गदर्शन केले अाणि अापण हे करु शकता असा अात्मविश्वास शिक्षकांमध्ये निर्माण करुण सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.....
          नंतर मा.समाधान शिकेतोड सर यांनी सुत्रे अापल्या हाती घेतली व उपस्थित उपक्रमशिल शिक्षकांना अापअापल्या शाळेत राबवल्या जाणार्‍या भाषा समृद्धीसाठी  उपक्रमांचे थोडक्यात सादरीकरण करण्याचे सुचवले.त्यानुसार अनेक शिक्षकांनी सादरीकरण केले त्यामध्ये बालाजी इंगळे सर उपक्रमशिल शिक्षक व नव्या दमाचे सृजनशिल साहित्यिक यांनीही वेगवेगळ्या प्रभावी उपक्रमांची ओळख पीपीटीच्या साह्याने करुन दिली.....
      तसेच समाधान शिकेतोड सर यांनी हांडोग्री शाळेत राबवलेल्या विविध प्रभावी उपक्रामाचे सादरीकरण केले व पहिल्या सत्राची सांगता  केली......
    नंतर सर्वांनी 2 ते 2:30 या कालावधित सर्वांनी रुचकर जेवनाचा अास्वाद घेतला.
      लगेच दुपारच्या सत्राला सुरुवात झाली.यामध्ये सर्वप्रथम गेष्ट लेक्चर श्री मेनगुळे सर(केंद्रप्रमुख) यांनी लातूर जिल्ह्यात स्वअभिव्यक्ती संदर्भात राबवण्यात अालेल्या उपक्रमाची चर्चा केली..व पेठ शाळेतील शिक्षकांचे अनुभव कथन केले.
        यानंतर मा.धुमाळ सर व शिकेतोड सर यांच्या मार्गदर्शनात *क्षेत्रनिहाय कृतीअाराखडा*
तयार करण्यात अाला त्यामध्ये

१) *श्रवण*
२) *भाषण*
३) *वाचन*
४) *लेखन*
५) *स्वअभिव्यक्ती*
६) *कार्यात्मक व्याकरण*

या क्षेत्राचा प्रामुख्याने विचार करुण सर्व उपस्थित शिक्षकांकडून गटनिहाय प्रभावी उपक्रमाचे संकलन करण्यात अाले.या सर्व उपक्रमाची अंमलबजावणी येत्या काळात शाळास्तरावर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता स्तर उंचावून संपूर्ण शाळा प्रगत कण्याचे योजिले अाहे..
  अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली असून शेवटी सर्वांचे अाभार मानून सांगता करण्यात अाली
..................................
    🌱 *शब्दांकन*🌱
✍ *मारुती खुडे*
जि.प.प्रा.शा.तांदुळवाडी ता.वाशी.

No comments:

Post a Comment