Wednesday, 20 July 2022

वाचनालय उपक्रम

काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या आमच्या शाळेत सर्व शिक्षकांनी मिळून शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके एकत्र केली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत त्याची विभागणी केली. विद्यार्थ्यांच्या वयोगटाुसार भाविश्वानुसार पुस्तके वेगवेगळी केली.

शाळेतील ग्रंथालयात खूप सारी जुनी पुस्तके होती. नुकतीच मी एनबीटीची पुस्तके शाळेला भेट दिलेली होती ती पुस्तके एकत्र केली. वर्ग शिक्षकांना ती पुस्तके सुपूर्द केली. ग्रंथालयातील पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी काम केले जाणार आहे. या पुस्तकांवर विविध उपक्रम, प्रकल्प, कृती घेतल्या जाणार आहेत. लोकसहभागातून आमच्या शाळेतील ग्रंथालय समृद्ध केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment