शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक,लेखक,सामाजिक प्रश्नाची उत्तम जाण व आकलन असणारे आदरणीय हेरंब कुलकर्णी सरांसोबत त्यांच्या उस्मानाबाद दौर्यामध्ये त्यांच्यासोबत फिरण्याचा योग आला.
महाराष्ट्रातील बालविवाहाची समस्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांचा अभ्यासदौरा सुरू आहे. प्रत्यक्ष क्षेत्र भेटीतून वेगवेगळया क्षेत्रातील लोकांशी संवाद साधून ही समस्या समजून घेत आहेत.या विषयाचा अभ्यास करत आहेत.
त्यांच्या सहवासात शिक्षणातील अनेक बाबींवर चर्चा केली.सरांची जवळपास चौदा पुस्तके प्रकाशित आहे.बसने प्रवास करून महाराष्ट्र पालथा घालून वंचिताचे प्रश्न,शिक्षणातील प्रश्न समजून घेण्याची जिद्द प्रेरणादायी आहे.
No comments:
Post a Comment