Saturday, 21 May 2022

जागतिक मधमाशी दिन

संयुक्त राष्ट्रसंघाने २० मे २०१८ पासून २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला आहे. या दिवशी मधमाशांचे संवर्धन करण्यासह कीटकांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती केली जाते. या निमित्ताने मुलांनी आज मधमाशीचे सुंदर चित्र काढायला हवे.मधमाशीबद्दल अधीक माहिती शोधायला हवी.

 मधमाशी हा पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मधमाशी हे जीवसृष्टीला मिळालेले सर्वोत्तम वरदान आहे. मधमाशीला सामाजिक कीटक असे म्हटले जाते. मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर परागकणांचे स्थलांतर करतात त्यामुळे परागीभवन घडून येते. परागीभवनामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

शेतकऱ्यांनी मधमाशी पालन करायला हवे.मधमाशी पालन हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. 

 मधमाशी हा जीवसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे.मधमाशी सारखा उपयुक्त जीव नष्ट होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी.मधमाशा नष्ट झाल्या तर आपल्याला औषधी गुणधर्म असणारा मध मिळणार नाही.पिक उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होईल.

No comments:

Post a Comment