Friday, 4 September 2020

विशेषांकाचे संपादन : नवनिर्मितीचा आनंद


गेल्या शैक्षणिक वर्षात मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी व शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम व उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.या रचनात्मक कार्याच्या संदर्भात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद मार्फत सिद्धी,लक्ष्य,वेध व स्पंदन या विशेषांकाचे संपादन करण्यात आलेले आहे. 

 निती आयोगांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमांविषयी 'लक्ष्य' या विशेषांकाचे संपादन केलेले आहे.शिक्षक व पर्यवेक्षिय यंत्रणेतील अधिकारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या यशोगाथा वेध या विशेषांकामध्ये घेण्यात आलेल्या आहेत.विशेष गरजा असणा-या मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या रचनात्मक कार्याबद्दल 'स्पंदन' या विशेषांकाचे संपादन केलेले आहे. 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील गुणवत्तेच्या विकासासाठी जिल्ह्याची शिखर संस्था म्हणून कार्य करते.या संस्थेतील मराठी,इंग्रजी,उर्दू,गणित,विज्ञान, सा.शास्त्र,आय.टी,समता,संशोधन या विभागांनी केलेल्या गुणवत्ता वाढीसाठीच्या उपक्रमाबाबत सिद्धी या विशेषांकांचे संपादन करण्यात आलेले आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद संस्थेतील मा.प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डायट मधील अधिकारी,संपादक मंडळ,उपसंपादक,कार्यकारी संपादक यांनी विशेषांकाच्या निर्मितीसाठी मेहनत घेतली.

विशेषांकाचे संपादन करत असताना स्वतःला समृद्ध करणारे अनुभव मिळाले.'सिद्धी' व 'वेध' या दोन विशेषांकाच्या निर्मितीमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.विशेषांक हातात पडल्यानंतर खुप आनंद वाटला. नवनिर्मितीचा आनंद काही औरच होता.

No comments:

Post a Comment