Wednesday, 3 July 2024

भोपाळ डायरी

📌 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कार्यशाळेत राज्यातील तज्ञ व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाली. राज्य मराठी भाषा विकास संस्थेचे माजी संचालक डॉ.आनंद काटीकर,मराठीतील प्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि संपादक तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्या मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे ह्या विभागाचे माजी संचालक डॉ.रमेश वरखेडे, प्रसिद्ध लेखिका डॉ. मंगला वरखेडे, बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे, प्राध्यापक विजयकुमार पाईकराव अशा तज्ज्ञ व्यक्तींसोबत काम करताना खूप शिकायला मिळत आहे. 

📌 भोपाळमधील  इकतारा ट्रस्ट प्रकाशनाचे प्रकाशक आदरणीय सुशील शुक्ल यांची भेट घेतली. त्यांच्याशी बालसाहित्यावर चर्चा केली. या प्रकाशनाच्या माध्यमातून हिंदीमधील उत्तम बालसाहित्य निर्माण केले जाते. काही हिंदीमधील बाल साहित्यविषयक पुस्तकांची खरेदी केली. या पुस्तकातील थीम भन्नाट होत्या. चित्रे तर खूपच छान होती. असं बालसाहित्य मराठी मध्ये तयार व्हायला हवं.

📌 पुण्याहून भोपाळ येताना भोपाळमधील एका मित्राची चांगली गट्टी जमली होती. त्यांचा टूर अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतली. मैत्री होण्यासाठी एक प्रवास सुद्धा पुरेसा आहे.

No comments:

Post a Comment