Friday 22 November 2019

अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव सहविचार सभा संपन्न



 स्थळ- DIECPD,औरंगाबाद.
 दिनांक- 21 नोव्हेंबर 2019

               प्रेरणा व मार्गदर्शन 
              मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख
             DIECPD,औरंगाबाद.

                  ⚡ सुलभक⚡
                समाधान शिकेतोड
विषय सहायक,DIECPD,उस्मानाबाद.
सदस्य,राज्य अभ्यास मंडळ महाराष्ट्र राज्य,पुणे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी,100% मुलांच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था औरंगाबाद या ठिकाणी DIECPD औरंगाबाद मधील सन्माननीय अधिकारी,विषय सहायक,मराठी विषयाचे साधनव्यक्ती यांची सहविचार सभा संपन्न झाली.

 मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख,प्राचार्य  DIECPD,औरंगाबाद यांनी सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
 अध्ययन निष्पत्ती विकासाचे टप्पे यांवर चर्चा झाली. मूलभूत क्षमता विकसीत करण्यासाठी अध्ययन समृद्धी साहित्य पेटीतील साहित्याचे व्यवस्थापन व अक्षर गट पद्धतीने मुलांना वाचनाचे अध्ययन अनुभव देणे यावर चर्चा झाली.
100% मुलांना अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी विविध अध्ययन स्त्रोतांचा अध्ययन अनुभव देताना वापर करणे.
मुलांना समजपूर्वक वाचनाच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी बोलो अॅप,स्टोरी व्हिवर, (https://storyweaver.org.in/)
याचा वापर अध्ययन अनुभव देताना करायला हवा. याबद्दल सविस्तर माहिती समाधान शिकेतोड यांनी सर्वांना शेअर केली.
 ग्रंथालय समृद्ध करणे,मुलांच्या वयोगटानुसार उपलब्ध पुस्तकांचे ग्रेडींग करणे.पुस्तकावर अध्ययन अनुभव देण्याचे प्लॅन तयार करणे.प्रकटवाचन,सहभागी वाचन,मार्गदर्शीत लेखन या कृती पुस्तकावर घेता येतील. यातुन त्या त्या इयत्तेच्या अध्ययन निष्पत्ती मुलांना प्राप्त होण्यास मदत होईल. याबद्दल स्वतः प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या आधारे समाधान शिकेतोड यांनी सांगितले.
 पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटक अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव कसा देता येईल. यावर चर्चा झाली.
 क्वेस्ट मार्फत भाषाशिक्षणाच्या कोर्स मधील भाषाशिक्षणाचा शास्त्रीय दृष्टीकोन,प्रत्यक्ष मुलांसोबत केलेले काम व मिळालेला परिणाम याबद्दल सांगितले.
 मा.दत्तात्रय जगताप,शिक्षण संचालक(प्राथमिक) व मा.डाॅ. सुभाष कांबळे,संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांनीही यावेळी भेट देऊन संवाद साधला.
 मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख,प्राचार्य, DIECPD औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील नियोजन करण्यात आले.

औरंगाबाद टिमशी भेटून खुप छान वाटलं.मा.डाॅ.विशाल तायडे,प्रसिद्ध बालसाहित्यक तथा वरिष्ठ अधिव्याख्याता यांच्याबरोबर बालसाहित्यक या विषयावर चर्चा झाली. एकमेकांच्या शेंअरीग मधून नवीन शिकता आलं.

समाधान शिकेतोड
DIECPD,उस्मानाबाद.




No comments:

Post a Comment