Tuesday 15 October 2019

वाचन प्रेरणा दिन

आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त कर्मवीर बालक मंदिर प्राथमिक शाळा उस्मानाबाद या शाळेस भेट दिली.शाळेतील मुलांना आदरणीय माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती सांगितली.डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी प्रतिकूल व हलाखीच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने प्रचंड मेहनत व अभ्यास करून यश मिळवले. याबद्दलचे त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी अनुभव मुलांना सांगितले. हे अनुभव गोष्टीच्या स्वरूपात सांगितल्यामुळे मुलांनी चांगला प्रतिसाद दिला.पालकांना खाऊ बरोबरच गोष्टीच्या पुस्तकांची मागणी करावी. नेहमी वाचत राहावे याबद्दल मुलांना सांगितले. शाळेत वाचन प्रेरणा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. 
मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचे पुस्तके, वर्तमानपत्रे मुलांना वाचायला दिली होती.काही मुलांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विषयी भाषणे केली.मुलांसोबत संवाद साधून मलाही खूप आनंद वाटला.

       
         शाळेच्या मुख्याध्यापकांना पुस्तक भेट देताना

No comments:

Post a Comment