Tuesday 20 August 2019

state assessments project workshop

state assessments project workshop  ची कार्यशाळा नुकतीच पुण्यात संपन्न झाली.या कार्यशाळेत वेगवेगळया साहित्यप्रकारावर प्रश्ननिर्मिती कशी करावी.त्यावर पर्याय कसे तयार करावे.याबद्दलचे मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञांकडून आम्हाला मिळाले.या कार्यशाळेत DIECPD मधील अधिकारी सहभागी झाले होते.भाषा व गणित या विषयावर काम झाले.खूप काही नवीन शिकायला मिळाले.
इयत्ता तिसरी,पाचवीसाठी भाषा व गणित विषयातील आशयावर प्रश्न निर्मिती केली. भाषा विषयासाठी समजपूर्वक वाचन या क्षमतेसाठी अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्न निर्मिती केली. बातमी,जाहिरात,उतारा अशा विविध लेखन प्रकारावर प्रश्न निर्मिती केली. आमच्या गटात श्री.गणेश शिंदे,वरिष्ठ अधिव्याख्याता,श्री.भालचंद्र पाटील, अधिव्याख्याता,श्री.गणेश गोरे, अधिव्याख्याता,श्री.नेताजी चव्हाण,विषय सहायक हे होते .गटात खुप चिंतन,चर्चा होत असे.प्रशिक्षणाचे स्थळ फाईव्ह स्टार हाॅटेल असल्यामुळे भौतिक सुविधा भरपूर होत्या.वेळ प्रसंगी काही अडचण आली की आम्ही प्रशिक्षक श्री.माईक सर यांची भेट घेत असू.माईक सर आमचा मराठी आशय इंग्रजीत समजून घेत.त्यावरील प्रश्न व पर्याय समजून घेऊन आम्हाला मार्गदर्शन करीत असत. आम्हाला त्यांच्याकडून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
                         गटामध्ये चर्चा करताना

No comments:

Post a Comment