Sunday 3 March 2019

समज पूर्वक वाचन कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद शाळा मधील ग्रंथालये झाली समृद्ध

समज पूर्वक वाचन  कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद शाळा मधील ग्रंथालये झाली समृद्ध
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
दिनांक-26/2/2019
स्थळ-ज.मा.प्रा.वि.मं.पारा चौक वाशी

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.

समजपूर्वक वाचन क्षमता विकास कार्यक्रम-2018-2019

एकदिवसीय प्रशिक्षण व अध्ययन साहित्य  (पुस्तक,वाचनकार्ड) वाटप कार्यक्रम.
--------------------------------------

        🌈 प्रेरणा  🌈
    मा.डाॅ.संजय कोलते
    मुख्य कार्यकारी अधिकारी
   जिल्हा परिषद उस्मानाबाद.

    📚 प्रमुख मार्गदर्शक 📚
     मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख
   प्राचार्य,DIECPD उस्मानाबाद.

   💐 प्रमुख उपस्थिती💐
      मा.नारायण मुदगलवाड
           मराठी विभाग प्रमुख
          DIECPD उस्मानाबाद.
           मा.राहुल भट्टी
          गटशिक्षणाधिकारी
        पंचायत समिती वाशी

⚡ मराठी भाषा विभाग⚡
        मा.नारायण मुदगलवाड
          मराठी विभाग प्रमुख
        DIECPD,उस्मानाबाद
        श्री.समाधान शिकेतोड
            विषय सहायक
        DIECPD उस्मानाबाद.
        श्री.नेताजी चव्हाण
            विषय सहायक
        DIECPD उस्मानाबाद.

अध्ययन निष्पत्ती आधारीत वर्गांतर क्रिया घडाव्यात,सर्व विद्यार्थ्यांच्या समजपूर्वक वाचनाच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त व्हाव्यात यासाठी वाशी तालुक्यात  जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद मराठी भाषा विभागा तर्फे  समजपूर्वक वाचन हा  पथदर्शी प्रकल्प वाशी तालुक्यात राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद तर्फे पुस्तके व वाचनकार्ड वितरीत करण्यात आली.याप्रसंगी मा. डॉ.कलिमोद्दीन शेख,प्राचार्य डिआयसीपीडी उस्मानाबाद. मा.राहुल भट्टी,गटशिक्षणाधिकारी,मा. नारायण मुदगलवाड विभाग प्रमुख मराठी डिआयसीपीडी उस्मानाबाद,समाधान शिकेतोड, नेताजी चव्हाण विषय सहायक मराठी,शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती व इयत्ता तिसरी,चौथी,पाचवीला मराठी विषयाचे अध्यापन करणारे शिक्षक उपस्थित होते.

शिक्षकांसाठी समजपूर्वक वाचन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी डिआयसीपीडी चे प्राचार्य मा.डॉ.कलिमोद्दीन शेख यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी समजपूर्वक वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रभाविपणे राबवल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षकांनी आपआपले अनुभव सादर केले. विविध साहित्यातील मजकूर मुले समजपूर्वक वाचत आहेत.याबद्दल अनुभव कथन केले.या कार्यशाळेला मा.नारायण मुदगलवाड विभाग प्रमुख मराठी,समाधान शिकेतोड,नेताजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सर्व BRC टिम वाशी परिश्रम घेतले.


           






No comments:

Post a Comment