Thursday 7 February 2019

हिंदी विषय माध्यमिक शिक्षक उद्बोधन कार्यक्रम-राज्यस्तरीय प्रशिक्षण उस्मानाबाद

हिंदी विषय माध्यमिक शिक्षक उद्बोधन कार्यक्रमाचे राज्यस्तरीय तिन दिवसीय  प्रशिक्षण आज संपले.राज्यातील सर्व जिल्हातील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणाचे नियोजन आमच्या मराठी विभागकडे होते.सर्व प्रशिक्षणार्थ्यांची निवासाची,भोजनाची व्यवस्था,तज्ञ मार्गदर्शकांची व्यवस्था,प्रशिक्षण सुविधा या सर्वांची जबाबदारी पार पाडायची होती.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी अत्यंत विश्वासानं ही जबाबदारी उस्मानाबाद DIECPD वर सोपविलेली होती.SCERT मा.जगराम भटकर उपसंचालक,मा.सुजाता लोहकरे यांचे मार्गदर्शन व सुचना मिळात होत्या.समाधान आहे म्हटल्यावर सर्व व्यवस्थापन मस्तचं होणार हा गाढा विश्वासच की.......

आमचे प्रेरणास्थान आदरणीय डाॅ. कलिमोद्दीन शेख प्राचार्य DIECPD उस्मानाबाद यांनी आम्हाला सर्व मार्गदर्शन केले. आदरणीय शेख सर स्वतः काम करत होते.स्वतःला अतिसामान्य ठेवत प्रत्येक मुलं शिकावं यासाठी सरांची तळमळ,परिश्रम प्रचंड आहे.त्यांच्या सहवासात आम्ही खुप काही शिकत आहोत.

"चांगल्या  माणसांचा सहवास व चांगली पुस्तकं माणसाला घडवतात."
आदरणीय डाॅ. शेख साहेब यांचा सहवास समृद्ध करणारा आहे.

आमचे विभाग प्रमुख मा.नारायण मुदगलवाड व सहकारी मित्र नेताजी चव्हाण,विवेकानंद कदम आम्ही सर्वानी उत्तम प्रकारे प्रशिक्षण पार पाडले.
प्रशिक्षणातील आशय प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहचवला.तज्ञ मार्गदर्शक म्हणून हिंदी विषयाचे अभ्यास मंडळ सदस्य आले होते.

सर्व विषयाचा समवाय,अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव, स्तराधारित अध्ययन कार्यक्रम, कृतिपत्रीका या चार सत्रामध्ये प्रशिक्षण संपन्न झाले. ही चार सत्रे जिल्हास्तरावर होणार आहेत.यासाठी या चार सत्रातील संकल्पना स्पष्ट केल्या.अगोदर मराठी विषयाचे या संदर्भातील काम केल्यामुळे हिंदी विषयाच्या अडचणी समजून शंकांचे समाधान करता आले.हा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता.खुप जणांनी प्रत्यक्ष भेटून कौतुक केलं.

      या प्रशिक्षणातून नवीन मित्र मिळाले.आपुलकी,प्रेम,जिव्हाळा माणसांना जोडत जातो.माणूसकी वाढवत जातो.या तिन दिवसात खुप परिश्रम घ्यावे लागले. पण या लोकांच्या चेह-यावरील कृतज्ञता पाहून मन भरून आलं. जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी मनापासून शुभेच्छा...........

No comments:

Post a Comment