Thursday 9 February 2017

● शाळा सिद्धी कार्यशाळा ● ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

● शाळा सिद्धी कार्यशाळा ●
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
     स्थळ - गटशिक्षण कार्यालय कळंब
दिनांक - 9 फेब्रुवारी  2017

आज गटशिक्षण कार्यालय कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे कळंब तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न झाली.
राज्य निर्धारक समाधान शिकेतोड व दिलीप चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सन्माननीय देशमुख मॅडम,सन्माननीय सर्व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
📌 शाळा सिद्धी रजिस्ट्रेशन चा व्हिडीओ दाखवण्यात आला.
📌 पुढील मुद्देनिहाय प्रत्येक क्षेत्राची रचना समजून घेतली.
⚡महत्त्व
⚡सूचक मार्गदर्शके
⚡वस्तुस्थितीदर्शक माहिती
⚡गाभा मानके
⚡वर्णन विधाने
⚡पुराव्याचे स्त्रोत
⚡नाविन्यता
⚡प्रतिसाद तक्ता
⚡ सुधारणे साठी नियोजन
📌 शाळा सिद्धी चे शासन निर्णय समजून घेतले.
📌  वर्णन विधानांचा अभ्यास करून क्षेत्रनिहाय माहिती भरणे.
PPT च्या सहाय्याने समजून घेतले.    
📌 प्रत्येक क्षेत्रनिहाय गाभा मानकांची चर्चा केली.
📌 मुख्याध्यापकांच्या शंकांचे निरसन केले.
📌 क्षेत्र निहाय व लेवल नुसार गुणदान समजून घेतले.
📌शाळेत सहविचार सभा घेऊन  शाळेतील शिक्षकांनासोबत  शाळा सिद्धी बद्दल चर्चा करण्याचे ठरले.
📌 शाळा सिद्धी पुस्तिकेचे वाचन व अभ्यास करून शाळेचे स्वयंमुल्यमापन करावे.

*सर्व मुख्याध्यापकांनी  लवकरच 100 % शाळांची नोंदणी करून स्वयंमुल्यमापन पुर्ण करण्याचा निर्धार केला.*

*निर्धारक*
*समाधान शिकेतोड*
  *दिलीप चौधरी*

समाधान शिकेतोड
निर्धारक, शाळा सिद्धी विद्याप्राधिकरण पुणे.
विषय सहायक DIECPD उस्मानाबाद.

No comments:

Post a Comment